डायरी क्र 1 से यहाँ उतारें
गोपीनाथ
गोपीनाथ
गावातून शहरांत आला
डोईवर गाठोडं आहे !
त्याला आता रस्ता ओलांडायचा आहे.
समोर रस्तेच रस्ते
यातला कोणता रस्ता नाशिकला जातो ?
शहरांत येऊन संभ्रमित झालाय गोपीनाथ
डोक्यावरल्या गाठोड्याने अजून पंचाईत केलीय
थांबून थांबून माना वळताहेत
गाठोडं पाहून .....
शहरांत आता कधी कुणी पाहिलीत गाठोडी
त्यातल्या
गाठी गाठी अन् गाठी...
त्यांत बॉम्ब तर नाही?
कोण आहेस? कुठे चाललास?
पोलिस चौकी लांब नाही
एकेकाची भिती
एकेकाच्या तोंडाला सुटलेले पाणी
सगळे त्या गाठोड्याच्या गाठीत अडकलेत
कपडे बांधून गाठोड्यांत घेऊन
आला होता गोपीनाथ
गोदेत स्नानासाठी
ही यात्रा गोदेच्या निर्मळ पाण्यांत
स्नान करण्यासाठीच होती
पण कुठली गोदा?
कुठली गंगा?
सध्या तर फक्त रस्ता ओलांडायचा आहे
गाठोडं उगीच आणलं त्याने
शंका आणि तमाशा घडवणारं !
================================
- Manohar Ahire, Priyadarshan Kale, DrMadhavi Kharat and 17 others like this.
No comments:
Post a Comment