Sunday, October 21, 2012

नंद चतुर्वेदी 7 कविताओंका मराठी अनुवाद फॅन्सी ड्रेस कॉम्पीटीशन

 फॅन्सी ड्रेस कॉम्पीटीशन
-- नंद चतुर्वेदी
(अनुवाद -- लीना मेहेंदळे)
अंतर्नाद ---- ???

फॅन्सी ड्रेस कॉम्पीटीशनमधे,
मिक्कू विवेकानंद झाला.
आम्ही सगळे खुश,
मी आणि मिक्कूचे आई बाबा,
चला, पोरगा विवेकानंद झाला.

वेषभूषा करून बाहेर आला
तेंव्हा "सबकुछ विवेकानंद"
कुठेही मिक्कूपण बाकी नव्हतं!

इतर मुले पण बनली --
योगी, यति, संन्यासी....

क़म्पीटीशन सुरु झाली तेंव्हा
विवेकानंदाचा गाजावाजा झालाच नाही,
आणि त्या योगी, यति, संन्यासींचा पण नाही...

कुणी एक जो सिकन्दर बनला होता
त्याच्याच एण्ट्रीवर टाळ्या वाजल्या
अगदी मिक्कू-विवेकानंदाने पण टाळ्या वाजवल्या.

आपण उगाचच बनवला मिक्कूला विवेकानंद
अशी हळहळ करत राहिलो --
मी, आणि मिक्कूचे आई-बाबा
--------------------------------------------------------------------------

No comments: