Tuesday, October 10, 2017

महाभारत व्याख्यानमाला १६ व १७ यक्षप्रश्न भाग 5 Mahabharat -- Yaksha Pras...

Monday, October 9, 2017

पक्ष्यांच्या अभयारण्यांत --ललित सुरजन यांच्या कवितेचा मराठी अनुवाद

पक्ष्यांच्या अभयारण्यांत
--ललित सुरजन यांच्या कवितेचा मराठी अनुवाद

पक्ष्यांच्या अभयारण्यात


हिमप्रदेशात कुठेतरी , किनारी
टुरिस्ट ऑफिसात लटकंतय् एक जीर्ण पोस्टर"चिलका
बघत म्हातारे हंस
हताश होऊन माना हलवताहे!
सारस जोडप्याच्या घरात आहेत एक आल्बम भरून फोटोग्राफ्स
शेवटच्या भरतपूरच्या ट्रिपचे 
केव्हा बरे गेलो होतो, तेही आता आठवत नाही
पण पोराबाळांना दाखवायला बरा आहे आल्बम
हंस, सारस आणि त्यांच्या तमाम दोस्तांना
आता हवा आहे एखाद्या नव्या जागेचा पत्ता
कारण इकडे रात्रंदिवसाच्या कोलाहलाने शिणलेली नबाबगंज झील
आता  अजूनच थोडी कोरडी होत चालली

सगळ्या अभयारण्यातून आता, अभय आहे फक्त शिकाऱ्याना
त्यांची चलाखी ओळखू शकतात फक्त तुर बगळे,
भात शेतांच्या बंधाऱ्या जवळील टेलिफोन बूथ वरून 
तेएसटीडी कॉल करतात मित्रांना आणि नातेवाईकांना
की इथल्या वातावरणांत धोका आहे
फोन करून परत जातात, आपापल्या झाडांवर
नीलकंठांना मात्र ते सुलेलं नाही 
रेल्वे लाइनच्या कडेला विजेच्या तारांवर बसून वाट बघतात.
दोस्तांना घेऊन येणाऱ्या गाडीची , 
आणि निराश होतात, बापडे

गाव वेशीच्या तलावाजवळ म्हाताऱ्या झाडावर बसंलाय् पोपट
एक पिल्लू सायंकाळच्या सुर्याचे प्रतिबिंब न्याहाळीत 
पण धास्तावलेली आई 
रागे भरत त्याला घेऊन गेली

त्यावेळी ,
जर्जर भिंती , रिकाम्या खोल्या आणि शंभरेक कुलपांच्या 
थोरल्या वाडयाच्या कैलारू परात
चर्चा करतंय् एक कबूरतरांजोडपं
चोचीत धरून एक दिवस आणल्या होत्या त्यांनी 
थोडया तुरीच्या शेंगा आणि दाणे विखरून टाकले होते
वाडयातल्या कच्च्या अंगणात, त्या थोडक्या बियातून उगवली आहेत
थोडकीशी झाडं, पोलेली आता वाडयाच्या परापर्यत
हळदी-केशरी फुलातून निघालेल्या फळभाराने
झुकली आहेत तुरीची झाडं
खूषीत आहे आता, कबूतरांजोडपं 
आणि शोधतंय् आसपास, आहे का कुणी संदेशवाहक कबूतर
सगळीकडे खबर द्यायला हवी आहे
सगळ्या दोस्तांना, सगळ्या आपल्यांना
की संकटातही अजून कधीतरी फुलं उमलतात!
(मूळ हिंदी --अक्षरपर्व, डिसेंबर१९९८ मधून साभार)
मराठी -- पालकमित्र दिवाळी 1999 मधे
मूळ हिंदी-ललित सुरजन

अनुवाद- लीना मेहंदळे